Home - Osmanabad Zilla Parishad
post img

तेरणानगर  बिट तालुका जिल्हा उस्मानाबादची खगोलशास्त्र क्लब संकल्पना

२०२० - १२ - २३

मा.विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांच्या फ्लॅगशीप अंतर्गत खगोलीय प्रयोगशाळा निर्मीती करीता जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गटशिक्षण कार्यालय, पंचायत समिती उस्मानाबाद अंतर्गत बीट तेरणानगर मध्ये दिनांक 18.12.2020 रोजी 26 दुर्बीण निर्मीती करीता कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस आयुका पुणे येथील खगोल शास्त्रज्ञ श्री.तुषार पुरोहित, लातूर विज्ञान केंद्र लातूर येथील सचिव श्री.अजय महाजन, यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत 26 शिक्षकांनी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत दुर्बीण निर्मीती करून संध्याकाळी 5.00 वा. नंतर आवकाश निरिक्षणाचा आनंद घेतला. या वेळी जिल्हा परिषद उस्मानाबाद चे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, यांनी तेरणानगर बीटमध्ये खगोलीय प्रयोगशाळे अंतर्गत दुर्बीण निर्मीती होत असल्याची बाब आनंददायी असून विद्यार्थ्यांना खगोलीय ज्ञानाची संधी उपलब्ध करून देणारी असल्याचे नमुद केले. याच वेळी शिक्षकांचे अध्यापन अभ्यासपुर्ण व वर्तन शिस्तबद्ध, चारित्र्य संपन्न असण्याविषयी ज्ञानेश्वरी मधील दाखले देवून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीमती किशोरी जोशी, विस्तार अधिकारी (शि) बीट तेरणानगर यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.श्री.संजयजी कोलते, यांनी प्रेरणा दिलेला दुर्बीण निर्मीतीचा उपक्रम मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांचे कालावधीत फलश्रुतीस आला. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवर्धनवाडी क्रमांक 2 येथील इयत्ता 4 थी मधील विद्यार्थीनी कु.अंकिती घाडगे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगाव येथील इयत्ता 7 वी च्या वर्गातील विद्यर्थ्यांनी दुर्बीण निर्मीती करीता आर्थिक योगदान दिले आहे. या कार्यक्रमास पंचायत समिती उस्मानाबादच्या गट विकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाणे व गटशिक्षणाधिकारी श्रीमती रोहिणी कुंभार यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी त्यांनी तेरणानगर बीटच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करून असे नवनवीन उपक्रम राबविण्या विषयी प्रेरणा दिली. या कार्यशाळेस गटशिक्षणाधिकारी यांच्या नियोजनाप्रमाणे उस्मानाबाद तालुक्यातील सर्व प्रशाला मुख्याध्यापक, सर्व क्षेत्रिय यंत्रणा व कार्यालयीन कर्मचारी या कार्यशाळेस उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वीते करिता गटशिक्षण कार्यालय उस्मानाबाद व तेरणानगर बीट मधील केंद्र प्रमुख व सर्व शिक्षक यांचे सहकार्य मिळाले.


Home - Osmanabad Zilla Parishad